शरद पवार गटातून ‘या’ बड्या नेत्याची हकालपट्टी

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने माढा या लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांना तिकीट दिले आहे.

रमेश बारसकर हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर बारसकर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. रमेश बारसकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी कार्यरत होते. मात्र वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिल्यानंतर आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वंचितचा किंवा वंचितच्या अन्य कोणत्याही नेत्याचा उल्लेख केलेला नाही

Leave a Comment