मोठी बातमी! भाजपाशी चर्चेनंतर शरद पवारांचा राजीनामा…..

शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी भाजपाशी चर्चा झाली होती. ते अनेकदा भाजपासोबत येणार होते. २०१९ ची चर्चाही शरद पवारांसोबत होती अशाप्रकारचे दावे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार अनेकदा आमच्यासोबत येणार होते, आमची २०१९ ला शरद पवारांशीच चर्चा झाली होती. इतर कुणाशी नाही. त्यानंतर अजित पवारांना वेळेवर तोंडघशी पाडण्यात आलं हे सर्वांनी बघितलं. अजित पवारांनी अपमानित व्हायचं आणि नेतृत्व यांनीच करायचे. अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावेळीही आमच्याशी चर्चा झाली होती. पवार अध्यक्षपद सोडून सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात संपूर्ण पक्ष महायुतीत येईल असं सांगितल्याचंही फडणवीसांनी म्हटलं.

तसेच महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण कुणी सुरू केले? शिवसेना कुणी फोडली? १९९२ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेना पहिल्यांदा कुणी फोडली? आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले. आज गोपीनाथ मुंडेंचं घर कुणी फोडले? त्यामुळे आम्ही केले तर ते राजकारण आणि त्यांनी केले तर तो राजकीय मुत्सदीपणा, एखादी गोष्ट घडली आणि त्याचा आम्हाला फायदा झाला तर राजकीय पातळी खाली गेला, घर फोडले, अशाप्रकारची विधाने दुटप्पीपणा आहे असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला. न्यूज १८ मराठीला फडणवीसांनी मुलाखत दिली त्यात ते बोलले.

Leave a Comment