अहमदनगरमध्ये मोठा ट्विस्ट, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा अपक्ष उमेदवारी अर्ज

नगर: खासदार सुजय विखे, आमदार निलेश लंके यांच्याबरोबरच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान आपण आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत असे जाधव यांनी सांगितले आहे. महायुतीच्या उमेदवारांविरोधात ही लढाई असून त्यांना चितपट करण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरला असे ते म्हणाले आहेत.

गिरीश जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सोबत नेत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या अर्जामुळे शिवसेनेत बंडखोरी तर झाली नाही ना? चर्चांना पेव फुटले आहे.

Leave a Comment