पराभवाची जबाबदारी स्वीकारुन महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा 

अमरावतीत भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन येथील शहर जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.

अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटे यांनी आपल्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला असून येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत.

त्यामुळे, येथील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन भाजपच्या प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर भाजपात पहिला राजीनामा पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

”उपरोक्त विषयान्वये, मी अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तरी राजीनाम्याचा स्विकार करावा, हि विनंती,” असे पत्र प्रवीण पोटे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांती पराभवाचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत.

Leave a Comment