पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारचं खातेवाटप आता जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात काही मंत्र्यांना गेल्या सरकारमध्ये जी खाती होती तीच खाती देण्यात आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची खाते हे भाजपाकडे ठेवल्याचं या खातेवाटपातून बघायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पुन्हा गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना पुन्हा संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा परिवहन आणि रस्ते मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना पुन्हा रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे.
केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची खातेवाटपाची संपूर्ण यादी
राजनाथ सिंह – संरक्षण (Defence Ministry)
अमित शाह – गृह (Home Ministry)
अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री (Ministry of Information and Broadcasting and Railway Ministry)
एस. जयशंकर – परराष्ट्र (foreign ministry)
नितीन गडकरी – परिवहन, रस्ते विकास (Transport, Road Development Ministry)
शिवराज सिंह चौहान – कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास (Agriculture / Panchayat Ministry)
मनोहर लाल खट्टर – ऊर्जा, शहरी विकास (Energy Ministry)
सीआर पाटील – जलशक्ती (Ministry of water power)
मनसुख मांडविया – कामगार (Ministry of Labour)
जेपी नड्डा – आरोग्य, रसायन आणि खते (Ministry of Health)
ललन सिंह – पंचायत राज आणि मत्स्य उत्पादन (Panchayat raj Ministry)
डॉ. विरेंद्र कुमार – समाजिक न्याय आणि अधिकारीता (Ministry of Social Justice and Empowerment)
चिराग पासवान- क्रीडा (Ministry of Sport)
किरेन रिजिजू – संसदीय कार्य (Parliamentary Affairs Ministry)
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास (Women and Child Development Ministry)
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण (Ministry of Civil Aviation)
सर्वानंद सोनोवाल – जहाज बांधणी (Ministry of Shipbuilding)
ज्युवेअल राम – आदिवासी कार्य (Ministry of Tribal Affairs)
किशन रेड्डी – कोळसा आणि खणन (Coal and Mining)
निर्मला सीतारामण – अर्थ (Finance Ministry)
जीतन राम मांझी – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (Micro Small and Medium Enterprises)
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण (Education Ministry)
एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग (Heavy Industry)
ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम (Telecom)
भूपेंद्र यादव -पर्यावरण (Environment)
प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण (Customer Protection)
गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक (Art, Tourism, Culture)
पीयूष गोयल – वाणिज्य (Commerce)
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग (Textile Industry)
स्वतंत्र प्रभार
इंदरजित सिंग राव – सांख्यिकी और कार्यक्रम कार्यान्वयन, नियोजन
जितेंद्र सिंग – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पीएमओ कार्यालय, अॅटोमिक एनर्जी आणि अंतराळ विभाग
अर्जुन मेघवाल – विधी आणि न्याय, संसदीय कार्य
प्रतापराव जाधव – आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण
जयंत चौधरी – कौशल्य, शिक्षण
राज्यमंत्री
जतीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
श्रीपाद नाईक – ऊर्जा
पंकज चौधरी – अर्थ
कृष्णा पाल – सहकार
रामदास आठवले – समाजिक न्याय आणि अधिकारीता
रामनाथ ठाकूर- कृषी आणि शेतकरी विकास
नित्यानंद राय – गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल- आरोग्य आणि कुटुंब विकास, रसायन आणि खते
व्ही. सोमण्णा – जलशक्ती आणि रेल्वे
डॉ. चंद्रशेखर पेमासानी – ग्रामिण विकास आणि दळणवळण
एसपी बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायत राज
शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार
बीएल वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
अजय टमटा – परिवहन आणि रस्ते
हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते
शांतनू ठाकूर – जहाज बांधणी
रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक
सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण
