लोकसभा निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, यावेळी नरेंद्र मोदी सरकारचा कार्यकाळ कसा असेल? यावेळीही ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकतील का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. शिल्पी धर यांनी याबाबत मोठी भविष्यवाणी केलीय.
नरेंद्र मोदींबद्दल ‘हे’ भाकीत
नरेंद्र मोदींबाबत ज्योतिषी डॉ. शिल्पी धर यांनी, ‘नरेंद्र मोदी तीन वर्षे पंतप्रधान राहतील. सध्या त्यांच्या कुंडलीत आणखी तीन वर्षांचा राजयोग आहे. अशा परिस्थितीत ते तीन वर्षे पंतप्रधान राहू शकतात. तीन वर्षांनी त्यांना आपले पद सोडावे लागू शकते. ते पुढे म्हणाले, ‘भाजपचे सरकार पडेल असे नाही, तर नरेंद्र मोदींना आपले पद सोडावे लागेल. त्यांच्या जागी अमित शहा, नितीन गडकरी किंवा योगी आदित्यनाथ पंतप्रधान होऊ शकतात.
