खासदार सुनेत्रा पवार यांचा निलेश लकेंवर निशाणा, म्हणाल्या

अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marane) याची पुण्यात भेट घेतली. यावेळी गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला.

निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आता अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी निलेश लकेंवर निशाणा साधलाय.

 

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? 

निलेश लंके ज्यांना भेटले ते कोण होते. हे सगळ्यांना माहिती होत त्याची कारणे शोधली पाहिजेत. मागे पार्थ पवारांनी भेट घेतल्यानंतर रान उठवलं गेलं. सर्वांना ही व्यक्ती कोण होते ते माहीत होतं. परत ही घटना घडली यावर विचार केला पाहिजे. बारामती निवडणूक पराभवबाबत आम्ही आत्मपरीक्षण करु, विचारमंथन करु. येणाऱ्या निवडणुकीत अस काही होणार नाही, काळजी करु नको. लंके ज्यांना भेटले ते कोण होते, असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.

Leave a Comment