संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी गावात ठिकठिकाणी गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून विविध साथींचे आजार उद्भवण्याची भीती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने गावात तणनाशक फवारणी करण्यात आली.
गावातील गावठाणात स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी असून, तसेच नागरिकही राहत आहे. त्यामुळे सतत मोठ्या प्रमाणात नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ नेहमीच सुरू असते. तसेच गावात असलेल्या मोकळ्या जागांवर गाजरगवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. गावात तणनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने तत्परतेने ठिकठिकाणी तणनाशक फवारणी केलीय.
