मोठी बातमी! मुळा नदीवरील साकूरनजीक मांडवे पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता….

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) अकोले तालुक्यातील मुळा नदीचा उगम असणाऱ्या हरिशचंद्रगड या मुळाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत चालली आहे. साकूरनजीक असणारा मांडवे पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर आणखी वाढून मुळानदीला मोठा पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुळा नदीला पाणी वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संगमनेर आणि पारनेर या दोन्ही तालुक्यांत जाण्यासाठी मुळा नदीवर मांडवे पूल असून नदीला पाणी वाढताच तो दरवर्षी पाण्याखाली जातो. त्यामुळे यावर्षी देखील मांडवे पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच संगमनेर व पारनेर तालुक्याचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

 

मांडवे आणि मांडवे परिसरातील सर्व ग्रामस्थांना इशारा करण्यात येतो की मुळा नदी काठ परिसर व साकुर मांडवे पुलावरू ये जा करणाऱ्या सर्व प्रवाशांना व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा मुळा नदीला पाण्याची पातळी वाढत असल्याने आपण नदीपात्रात जाऊ नये नदीला वरून पाणी सोडण्यात आलेले आहे तसेच संततधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढत आहे व वाढण्याची शक्यता असल्याने कोणीही नदीकाठावर पुलावरती जाऊ नये याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही सर्वांना नम्र विनंती – तहसील कार्यालय पारनेर

Leave a Comment