7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे.
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्त्याच्या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना एरिअर्सही मिळणार आहे. महागाई भत्तावाढीमुळे केंद्रावर दरवर्षी 12,815 कोटींचा बोजा पडणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाढीव महागाई भत्त्याचा 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर महागाई भत्त्यात ही वाढ करण्यात आली आहे.
