विहिरीत कासव पाहायला सांगितल, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यासोबत काय घडलं, वाचा….

नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन अल्पवयीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळमधील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शाळकरी मुलांच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळमध्ये शाळकरी मुलांना विहिरीत कासव असल्याचं सांगितलं. त्यानंतर विहिरीत कासव पाहण्यासाठी तिघे विहिरीजवळ गेले. विहिरीत डोकावून पाहताना संशयित तिघांनी तिन्ही शाळकरी मुलांना विहिरीत ढकललं. जीवे मारण्याच्या हेतूनेच विहिरीत ढकल्याचा तिघांच्या आई-वडिलांचा आरोप आहे.

तीन अल्पवयीन मुलांना विहिरीत लोटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. तिन्ही शाळकरी मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर एकाने विहिरीतील दोरीला पकडून स्वत:ला सावरत इतर दोघांचा जीव वाचवला. या घडलेल्या घटनेनंतर तिघांनी आई-वडिलांना संपूर्ण कैफियात सांगितली. या तिघांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकारानंतर सिन्नर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला आहे. सिन्नर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे. तिन्ही शाळकरी मुलांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीत लोटून दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment