कर्जमुक्ती व पारनेरच्या पाण्यासाठी शेतकरी भूमिपुत्र संघटनेचे आमरण उपोषण

दुष्काळग्रस्त पारनेर तालुक्याची ओळख कायमस्वरूपी पुसली जावी व कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी यासाठी भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी आपल्या सहकार्यांसह पारनेर तहसील समोर मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळवून पारनेरसह नगर जिल्हयातील दुष्काळग्रस्त भागाला देणे. कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगण सिद्धी, शहांजापुर उपसा सिंचन योजनेंना मान्यता देऊन कार्यान्वित करणे. डिंभे माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरु करणे, अटी शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करणे, नियमित कर्जदारांना प्रोत्साहन पर देण्यात येणारे पन्नास हजार रुपये अनुदान ठराविक शेतकन्यांना मिळाले. वंचित शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावे या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष राव वाडेकर यांनी पारनेरच्या पाण्याचा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत आमरण उपोषण करण्याची भूमिका स्पष्ट केली. वसंतराव शिंदे एस एल ठुबे सर यांनी सरकारला खडे बोल सुनावले. उपोषणस्थळी पारनेर तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी अशोकराव आंधळे, अविनाश देशमुख ,संतोष वाबळे, मनोज तामखेडे, अरुण बेलकर सर,अन्सार पटेल, अनिल सोबले ,एस एल ठुबे सर, अब्बासभाई इनामदार ,वसंतराव शिंदे, नंदू साळवे, रघुनाथ मांडगे, बाळासाहेब वाळुंज, अजित साळवे, भावेश गायकवाड, शिवाजी तांबे, दादू जांभळकर संजय भोर, पोपट दरेकर, दत्ता फटांगरे, बाबासाहेब वाडेकर, निवृत्ती कासुटे आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Comment