अकलूज : “एक घटना अशी झाली की, तुम्हा सर्वांना माहिती आहे. दो हंसो का जोडा म्हणजे मी आणि विलासराव देशमुख..पक्के मित्र होतो. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो. एकेदिवशी असाच विलासराव देशमुखांनी कागद आणला आणि सही करा म्हणाले. मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली.
तो कागद होता मुख्यमंत्री शरद पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला मुख्यमंत्री करा. मी फसलो होतो, पण शरदरावांना अखेर पर्यंत खरं वाटतं नव्हतं. पण मित्राकरिता फसलो होतो. मी त्याची कबुली जाहीरपणाने दिली. बरेच दिवस शरद पवारांना मान्य होत नव्हतं”, असा किस्सा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितला. ते अकलूजमधील कार्यक्रमात बोलत होते.
