मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात…..

राज्यात काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यातच होऊ घातलेल्या निवडणुकांच्या अगोदर आपला पक्ष बदल करण्याच्या हालचाली करत असल्याचेही पाहायला मिळत आहे.

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)च्या गटाच्या वाटेवर असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

राष्ट्रवादीचे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे. वळसे पाटील पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी तर दुसरीकडे वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील आता हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वळसे पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास हा अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे.

Leave a Comment