पुणे हादरले! कॉलेजमध्ये घूसून विद्यार्थ्यांचा खून

बारामती मधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा खून करण्यात आलाय. कोयत्याने वार करून, चाकू खुपसून विद्यार्थ्याचे आयुष्य संपवण्यात आले. अथर्व पोळ असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. या खूनप्रकरणी ओंकार भोईटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्याच्या बारामतीत असलेल्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय म्हणजेच टीसी कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. येथे शिकत असलेला विद्यार्थी अथर्व पोळचा कोयत्याने सपासप वार करून खून झालाय. यानंतर टीसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अथर्ववर कोयत्याने वार करण्यात आले. यानंतर त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. अथर्व पोळ असं खून झालेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. तो टी सी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. आरोपी ओंकार भोईटे व त्याच्या साथीदाराने हा खून केला असून आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॉलेजमध्येच खून झाल्याने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. हा खून का करण्यात आला? याची माहिती अद्याप समोर आली नाही.

Leave a Comment