नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. काँग्रेसने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार जाहीर केला आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या सुपुत्राला उमेदवारी जाहीर केला आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करत रणशिंग फुटलं आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती कोणाला उमेदवारी देणार, हे पाहावे लागेल.
नांदेड लोकसभा पोटनिवणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं होतं. या लोकसभा मतदासंघात रवींद्र चव्हाण यांच नाव निश्चित झालं. त्यानंतर आज काँग्रेसने अधिकृत जाहीर केलं.
नाना पटोले यांनी बुधवारी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं होतं. पटोले यांनी नांदेडमधून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली
