बिग ब्रेकिंग! महाराष्ट्रातून भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघातून ‘हे’ उमेदवार, वाचा नावे…

अहिल्यानगर(DSNews24/किरण पुरी) अखेर महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपची पहिली यादी जाहीर होणार अशी माहिती देण्यात येत होती. अखेर पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव विधानसभा मतदारसंघातून मोनिका राजळे, राहूरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजी कर्डिले, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते व कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे.

Leave a Comment