राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे-राणे वादात भर पडली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच ठाकरे गटाच्या आमदाराने भाजप आणि राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे…
दोन ते तीन महिन्यांत नारायण राणे(Narayan Rane) यांचे मंत्रीपद जाणार असल्याचे भाकीत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक(Vaibhav Naik) यांनी वर्तवले आहे.
हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे, असे देखील वैभव नाईक म्हणाले आहेत. नारायण राणे यांचे शिवसेनेवर टीका करण्याचे काम होते. ते काम आता संपलेले आहे
त्यामुळे त्यांचे मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे. असा दावा त्यांनी केला आहे. नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभे करायचे आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
