मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
धनू : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. शत्रूपीडा नाही.
मकर : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कुंभ : शासकीय कामे मार्गी लागतील. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.
