महाराष्ट्रात भाजपच्या “एवढ्याच” जागा निवडून येणार? ‘या’ नेत्याची मोठी भविष्यवाणी 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टोलेबाजी करताना दिसत आहेत. यातच आता, “जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून ‘बटेंगे तो कटेंगे’मध्येच अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. एवढेच नाही तर, “…याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत,” अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळी केली. ते बीडमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, “अमित शहा आणि ते योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतात. त्या योगींना माहीत नाही की, यांचा निम्मा उत्तर प्रदेश मुंबई आणि पुण्यात नोकरीला आलाय यांचा आणि आम्हाला येऊन शिकवताय की “बटेंगे तो कटेंगे”. याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला लगावला आहे.

Leave a Comment