साकूरच्या सभेतून खा. सुप्रिया सुळेंनी दिले मोठे संकेत, म्हणाल्या बाळासाहेब थोरात….

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचे अवघे काही तास शिल्लक शिल्लक राहिले आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे नगर जिल्हा दौर्‍यावर होत्या. यावेळी त्यांनी काल संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जाहीर सभेला हजेरी लावली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच सभास्थळी येताना खा सुप्रिया सुळे यांचं वाजतगाजत स्वागत करण्यात आले. 

जनतेच्या मनात जे स्वप्न आहे, ते माझेही स्वप्न आहे. सरकार आल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार हे नक्की आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व आ.बाळासाहेब थोरात करतील, असे स्पष्ट संकेत यावेळी सभेमधून दिले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर बाळासाहेब थोरातांवर मोठी जबाबदारी पडणार आहे एकप्रकारे खा. सुळेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत संकेत दिल्याचे मानले जात आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

यावेळी त्यांनी संगमनेरचे सुसंस्कृत राजकारण, आ.थोरात यांचे विधायक नेतृत्व आणि डॉ.जयश्री थोरात यांच्या निमित्ताने आश्वासक भावी राजकीय पिढी यांचा उल्लेख करत मोठे विधान केले. सभेला जमलेल्या गर्दीला उद्देशून त्या म्हणाल्या, आज मी प्रचाराच्या नव्हे तर जल्लोषाच्या सभेसाठी आले आहे. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी देखील इच्छा आहे. महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरच गरज आहे. मी आत्ताच बाळासाहेबांच्या कानात सांगितलं 2029 ला इथलं तिकीट आम्ही बदलणार आहे. (जयश्री थोरात यांच नाव घेत केलं वक्तव्य ) मला नाही वाटत बाळासाहेबांना ते आवडला असावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जेव्हा जेव्हा मी बाळासाहेबांना भेटते तेव्हा आदर्श मोठा भाऊ कसा असावा हे समजतं. महाविकास आघाडी सरकार असताना देखील काहीही समस्या झाली तर पवार साहेब आधी बाळासाहेबांनाच फोन करत होते आणि त्यानंतर प्रश्न सुटतो. आता त्यांना मतदान का करावं तर ते सुसंस्कृत आहेतच, मात्र आपलं सरकार आल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार हे नक्की ( जनतेतून मुख्यमंत्री झाले पाहिजे असा आवाज ) तुमच्या मनातलं स्वप्न पूर्ण कर हे साईबाबा आणि माझ्या पांडुरंगाला देखील सांगेल. त्यासाठी केवळ घोषणा नाही द्यायच्या इथे पण मतदान करा आणि सासरी देखील सांगा महाविकास आघाडीला मतदान करा…बाळासाहेब तुम्हाला विनंती आहे आपलं सरकार आल्यावर अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

Leave a Comment