विधानसभा निवडणूकीत काठावर पराभव झाला हा निश्चितच चिंतनाचा भागा आहे. तुम्ही आत्मचिंतन करा. आजचा व येणारा काळही आपलाच आहे. नीलेश लंके हा उगवता सुर्य आहे, तो खचत नाही. चुक झाली ती झाली आता आरोग्य शिबिराचे आयोजन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात करू या.
आपण आपल्या कामाच्या जोरावर राज्यात ओळख निर्माण केली आहे. विधानसभेत पराभव झाला म्हणून आपले राजकारण संपलेले नाही. चुकांच्या दुरूस्त्या करा. समाजाला दोष देऊ नका असा सल्ला खा. नीलेश लंके यांनी.
खा. निलेश लंके सुपा येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
