राज्यावर मोठ संकट, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात अलर्ट 

दक्षिण केरळ आणि अरबी समुद्रात पूर्वेकडून एक सायक्लोनिक सर्क्युलेशन येत आहेत. ते चक्रीवादळात बदलणार का यावर हवामान विभाग नजर ठेवून आहे. बंगालच्या खाडीपासून काही अंतरावर आणि राजस्थानलगतच्या भागात हवामानात मोठे बदल होत आहेत.

याचा परिणाम हवामानावर होत असून वातावरणात सतत बदल होत आहेत. पहाटेच्या सुमारास गारवा तर दिवस उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत.

किमान तापमानात घट होत असल्याने पुन्हा गारठा वाढू लागला आहे. कोकण किनारपट्टीलगच्या जिल्ह्यांमध्ये मात्र गारठा गायब झाला आहे. तिथे उष्णता वाढत आहे. गेले काही दिवस पहाटे धुक्याची चादर तर दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत. मुंबई, उपनगरात दमट वातावरणामुळे घामाच्या धारा वाहात आहेत. तर ठाणे नवी मुंबईत पहाटे गारवा आणि दिवसा जास्त उष्णता जाणवत आहे.

मुंबईच्या किमान तापमानात घट झाली आहे. 20 अशांच्या खाली पहाटे तापमान येतं त्यामुळे गारवा जाणवतो. मुंबईत सध्या संमिश्र वातावरण आहे. काही ठिकाणी निरभ्र आकाश तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. आजपासून तीन दिवस किमान तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने केला आहे.

पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यामधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पुण्यातील किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात देखील हवामानत बदल जाणवत असून काही ढिकाणी ढगाळ हवामान असणार आहे. तर वातावरणातील गारठा काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भातील काही भागांमध्ये थंडीचा कडाका अजूनही कायम आहे. दुपारी मात्र उन्हाचे चटके बसत आहेत. राज्यात येत्या आठवड्यात किमान तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Comment