नगर – दौंड रोडवर अपघात ; नगरचा युवक ठार

नगरजवळ दौंड रोड रोडवर झालेल्या अपघातांमध्ये युवकांचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. या दोन्ही अपघातांबाबत सोमवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नगर-दौंड रोडवर अरणगावच्या शिवारात दुचाकीवर चाललेल्या दोघा युवकांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अजय ताश काळे (वय 25 रा. खंडाळा ता. नगर) हा जबर जखमी होऊन जागीच मयत झाला.

तर राहूल शरद चव्हाण (रा. खंडाळा) हा युवक जखमी झाला. याबाबत मंगल यताश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment