ब्रेकिंग! बिरेवाडीत आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला….

संगमनेर(DSNews24/किरण पुरी)तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन ते चार बिबटे संचार करत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे या मोकाट बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानंतर बिरेवाडी येथील शेतकरी नवनाथ रंगनाथ ढेंबरे यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता.

दरम्यान भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता. मात्र अजूनही बिबटे मोकाट फिरत असल्याने पुन्हा त्याच परिसरात वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यामुळे पुन्हा एक बिबट्या आज पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

Leave a Comment