बिरेवाडीत “छावा” बघण्यासाठी पंचक्रोशीतील प्रचंड जनसमुदाय…

संगमनेर(DSNews24) दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा तसेच महाशिवरात्री उत्सवानिमीत्त बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री.महादेव मंदिर, बिरेवाडी येथे विवीध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत शिवनेरी रक्तपेढी, डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर, भव्य मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शिबीराचा लाभ घेतला.

तसेच संध्याकाळी ७.०० ते ०९.३० वाजता स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित “छावा” चित्रपटासाठी बिरेवाडी आणि पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यानंतर उपस्थित शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दरवर्षीपेक्षा यावर्षी खुप मोठा प्रतिसाद मिळाला आणि भव्यदिव्य कार्यक्रम संपन्न करण्यासाठी बिरेवाडी ग्रामस्थांबरोबरच युवा सहका-यांनी मोलाचे योगदान दिले, सामाजिक उपक्रम भव्यदिव्य स्वरुपात संपन्न करण्यासाठी प्रत्येक घटकाचे मोलाचे योगदान लाभले, स्वराज्य, अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत आणि ज्वलंत इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी छावा चित्रपटाचे आयोजन करण्यात आले, अशी प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी आमच्या वृत्त संस्थेशी बोलताना दिली.

Leave a Comment