शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; १४ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

केंद्र सरकार देशातील सातबाऱ्यावर नाव असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान( PM Kisan) निधी योजना चालवते. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ महिन्यांच्या अंतराने २-२ हजार रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये वर्ग केले जातात.

केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याची लवकरच तारीख जाहीर करू शकते. हा हप्ता एप्रिल ते जुलै २०२३ दरम्यान जारी होण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता २६ फेब्रुवारी २०२३ रोजी देण्यात आला होता. आता या योजनेत सामील होणाऱ्या नवीन शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लवकरच अर्ज करावा लागणार आहे.

दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे, ते लाभार्थी आहेत की नाही हे तपासू शकतात.

Leave a Comment