संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट उभे राहिले आहे. तसेच शेतपिकांनाही भाव नाही. शेती करायची म्हटले की आधी भांडवल गुंतवणूक कराव लागत. त्यातच एखाद्या पिकाला भाव मिळतो तर एखाद्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी काहीही येत नाही.
परंतु शेतकऱ्यांसाठी संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील नानासाहेब भोसले व अमोल भोसले या दोघा भावांनी साकूर व वरुडी फाटा या ठिकानी शेतीपंपाच्या दूरूस्तीसाठी खास सवलत देऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सवलतीच्या दरातच सबमर्शिबल मोटार रिवायडिंगचे काम करून मिळणार आहे.
साकूर – बिरेवाडी रोडलगत एक शाखा व पुणे – नाशिक महामार्गालगत साकूर फाटा जवळच वरूडी फाट्यावर माऊली इलेक्ट्रिकल्स मोटार रिवायडिंग अॅण्ड इंजिनीयरिंग वर्क्स ची दुसरी शाखा आहे. या दोन्ही शाखेच्या दूकानात पाणबुडी, सबमर्शिबल, मोटार पंप, तसेच बेअरिंग व बुशिंगचे काम केले जातात.
तसेच शेतीपंपाच्या मोटारींचीही कामे करण्यासाठी पठारभागातील असंख्य शेतकरी त्यांच्या दुकानात येत असतात. परंतु शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाच्या मोटारींचे काम करण्यासाठी खास सबमर्शिबल मोटारी काम करण्यासाठी खास सवलत दिली आहे.
३ एचपी पंपासाठी १ हजार २०० रूपये, ५ एचपी पंपासाठी १ हजार ५०० रूपये, ७.५ एचपी पंपासाठी २ हजार रूपये तसेच १० एचपी पंपासाठी २ हजार ८०० रूपये या दराप्रमाणे सर्व पंपाचे काम करून दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा वाचविण्यासाठी निर्णय नानासाहेब भोसले मो. 9850109972 व अमोल भोसले मो. 9822656465 या दोघा भावांनी घेतला आहे.
