महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत महत्वाची बातमी

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा नवी तारीख देण्यात आली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत 4 मे रोजी सुनावणी पार पडणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोणताही ठोस निर्णय न्यायालयात होऊ शकलेला नाही.

अशातच आणखी एक नवी तारीख न्यायालयाकडून देण्यात आली आहे. आता 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी पार पडेल.

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य या याचिकेवर ठरणार आहे. या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात समावेश करण्यात आला.

परंतु आजच्या सुनावणीतही यावर काही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरीच आहे.

Leave a Comment