पेट्रोल – डिझेलच्या किंमती वाढणार

सर्वसामान्यांच्या खिशाला चाप लावणारी बातमी समोर येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली.

जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये चढउतार सुरु आहे. त्यात ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तरात्मक शुल्काची घोषणा केली. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 8 एप्रिलपासून लागू होणार आहेत. सरकारकडून अधिकृत आदेश जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment