संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षीही आपले परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील कला,विज्ञान ,वाणिज्य या तीनही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेतून कु. नम्रता सचिन भुजबळ 71.67% घेऊन प्रथम तर कु. मैड वैष्णवी चिमा 68.17% द्वितीय व कुमारी भडांगे वर्ष सुभाष 67.83 % घेऊन तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेतून कुमारी मंडले मिताली मनेष 61.67% घेऊन प्रथम तर कुमारी वाळूंज आरती संदीप 60.50% घेऊन द्वितीय व कुमार मोरे आदित्य सुरेश 58.83% घेऊन तृतीय आला आहे. कला शाखेतून कुमार खेमनर सचिन उमाजी 74.17% घेऊन प्रथम कुमार घुले आदित्य अशोक 65.67 %घेऊन द्वितीय व कुमार दुधवडे ज्ञानेश्वर शांताराम 61.68%घेऊन तृतीय आला आहे.
यावर्षीही विद्याप्रबोधिनीचा निकालातील दबदबा कायम राहिला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत अशोकराव खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, सर्व संचालक मंडळ तसेच रजिस्ट्रार होळकर सर, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, इन्चार्ज कोळेकर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.
