Big Breaking.. साकूर येथे अप्पर तहसिल कार्यालय व्हावे, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा आढावा बैठकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी श्री.बाबासाहेब कोळेकर हे संगमनेर तालुक्यातील साकूर येथे आले होते. यावेळी साकूर मंडलातील सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत प्रशासकीय आढावा बैठकीचे आयोजन ग्रामसचिवालय,साकूर येथे करण्यात आले होते.

पठारभागामध्ये प्रथमच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायब तहसिलदार श्री.पऊळ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पा.खेमनर हे उपस्थित होते.

दरम्यान याप्रसंगी भाजपाचे अल्पसंख्यांक मोर्चा चे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.रऊफ शेख, ॲड.अमित धुळगंड यांनी अप्पर जिल्हाधिकारी श्री.कोळेकर यांचे साकूर येथे स्वागत केले.

तसेच पठारभागातील नागरिकांच्या प्रशासकीय सोयीसाठी महसुल मंडळाची पुनर्रचना करुन साकूर येथे अप्पर तहसिल कार्यालय व्हावे अशी मागणी या बैठकीच्या निमित्ताने साकूर येथे आलेल्या अप्पर जिल्हाधिकारी मा.श्री.बाबासाहेब कोळेकर यांच्या कडे भाजपाचे अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शिष्टमंडळात समवेत ॲड.अमित धुळगंड, बाळासाहेब कोंडाजी खेमनर, बुवाजी खेमनर, गुलाबराजे भोसले, सलीम शेख, सुभाषशेठ पेंडभाजे, सुभाष भुजबळ, संदीप खिल्लारी ई.महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पठारभागातील शेवटचे टोक असणार्‍या शिंदोडी,खरशिंदे येथील नागरिकांना सुमारे 50 किमी अंतर पार करुन तालुक्याच्या ठिकाणी संगमनेर तहसिल कार्यालय येथे दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी जावे लागते.भौगोलिक दृष्ट्या व प्रशासकीय सोयीसाठी साकूर हे अप्पर तहसिल कार्यालयासाठी योग्य पर्याय असुन महसुल मंडळाची पुनर्रचना करुन साकूर येथे अप्पर तहसिल कार्यालयाची निर्मिती व्हावी अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदना द्वारे केली आहे.

Leave a Comment