अहमदनगर : रिद्धी सिद्धी जिनिंगमध्ये झोपेत असलेल्या दोन बालकांचा टेम्पोच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना १७ एप्रिलला सकाळी सहाच्या सुमारास घडली.
सचिन लालसिंग मेवाड (वय ३०), कार्तिक लालसिंग मेवाड (वय २) रा. भगवानपुरा जि. खरगोण मध्यप्रदेश या दोन चिमुकल्यांचा सरकी पेंड वाहतुक करणाऱ्या टेम्पोखाली चिरडून मृत्यु झाला आहे. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.
सदर टेम्पो हा सरकी पेंड घेऊन पावसामुळे जवळच असलेल्या रिद्धी सिद्धी जिनिंगच्या शेडमध्ये उभा होता. सोमवारी सकाळी टेम्पो मागे घेत असताना जिनिंगच्या आवारात साखर झोपेत असलेल्या मजुरांच्या या दोन चिमुकल्या भावडांना टेम्पोने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला.
तर मुस्कान लालसिंग मेवाड (वय ६) ही मुलगी बाजुला पळाल्याने ती बालबांल बचावली गेली. मात्र ती किरकोळ जखम झाली आहे
