पारनेर (DSNews24/किरण पुरी) सर्वसामान्य नागरिकांसाठी रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून रेशनकार्ड कॅम्प मोठ्या उत्साहात सुरू आहे. गावोगावी या कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविंद्र राजदेव यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे पारनेरला जायचे हेलपाटे या कॅम्पमुळे वाचले आहे. रविंद्र राजदेवांच्या रूपाने सर्वसामान्य नेतृत्व उभे राहिले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिपक अण्णा लंके यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रेशनकार्ड व बांधकाम कामगार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. काटाळवेढा येथील ग्रामस्थांसाठी विशेष कॅम्पवेळी दिपक अण्णा लंके बोलत होते.
दरम्यान टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये आपली सेवा आपल्याच दारी हा अभिनव उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे
दरम्यान या कॅम्पमध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड online करणे, आधार कार्ड अपडेट करणे, बांधकाम कामगार कार्ड काढणे, नवीन मतदार नाव नोंदणी करणे, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड वरील नाव कमी करणे व दुरूस्ती करणे आदि सेवा दिली जाणार आहे. मात्र यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जाऊन उंबरठे झिजवावे लागतात. मात्र एका हेलपाट्यात काम होईल ही गॅरंटी देखील नसते मात्र विनाकारण एक दिवस वाया जातो. मात्र माजी सरपंच रविंद्र राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात कॅम्प राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी सर्व कामे करून मिळणार आहे.
विशेषतः या कॅम्पमध्ये आतापर्यंत २ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच या कॅम्पला अक्षरशः महिला, पुरूष तसेच ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कॅम्पसाठी स्वयंसेवक मदत करत आहे. आपली सेवा आपल्या दारी या सेवेबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून रविंद्र राजदेव यांनी हा उपक्रम चालू केल्याबद्दल कौतुक केले आणि आभार मानले .
यावेळी सरपंच पियूष गाजरे, पोपट गुंड, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गुंड, दत्ता भाईक, भास्कर महाराज भाईक, रामदास गाजरे, मा. सरपंच सुदाम गाजरे, मा. चेअरमन हरी डोंगरे, संभाजीराजे भाईक, पांडुरंग गुंड, गोविंद गुंड, शरद पुरी, मा. चेअरमन आर वाय गुंड सर, बाळासाहेब दिवेकर, सोसायटी संचालक बबन गाजरे, चेअरमन शरद गगे, मा.चेअरमन लक्ष्मण भाईक, मा. चेअरमन शिवाजी डोंगरे, मा. सरपंच बाळासाहेब गुंड, भिमा गाजरे, सुभाष गाजरे, बाळासाहेब सरोदे, राजू डोंगरे, ह.भ.प.राजू डोंगरे, गोपीनाथ गुंड, शोभा भाईक, अर्चना दिवेकर, बाबजी डोंगरे, संपत भाईक, दत्तात्रय भाईक, आदींसह काटाळवेढा व डोंगरवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
