रविंद्र राजदेव हेच आमचे आधारवड, आपला माणूस आपल्यासाठी…..कॅम्पमधील नागरिकांमध्ये चर्चा 

पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रेशनकार्ड व बांधकाम कामगार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. आज म्हसोबा झाप येथील ग्रामस्थांसाठी देखील कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते दिपक अण्णा लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये आपली सेवा आपल्याच दारी हा अभिनव उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून रेशनकार्ड कॅम्प अतिशय उत्साहात सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांचे पारनेरला जायचे हेलपाटे या कॅम्पमुळे वाचले आहे.

मात्र या कॅम्पमुळे रविंद्र राजदेव यांचं अक्षरशः सर्वत्र कौतुक होत आहे. कॅम्पमध्ये येणारे नागरिकांमध्ये रविंद्र राजदेव हेच आमचे आधारवड असल्याची चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांशी आपुलकीने संवाद साधून रविंद्र राजदेव काम मार्गी लावत आहेत. त्यामुळे आपला माणूस आपल्यासाठी हीच वाक्य जनसामान्यांच्या ओठात पुटपुटत आहे. टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात रविंद्र राजदेव यांची जोरदार हवा तयार झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा ओढा रविंद्र राजदेव यांच्यामागे दिसत आहे.

या कॅम्पमध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड online करणे, आधार कार्ड अपडेट करणे, बांधकाम कामगार कार्ड काढणे, नवीन मतदार नाव नोंदणी करणे, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड वरील नाव कमी करणे व दुरूस्ती करणे आदि सेवा दिली जाणार आहे. मात्र यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जाऊन उंबरठे झिजवावे लागतात. मात्र एका हेलपाट्यात काम होईल ही गॅरंटी देखील नसते मात्र विनाकारण एक दिवस वाया जातो. मात्र माजी सरपंच रविंद्र राजदेव यांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात कॅम्प राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी सर्व कामे करून मिळणार आहे.

विशेषतः या कॅम्पमध्ये आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच या कॅम्पला अक्षरशः महिला, पुरूष तसेच ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कॅम्पसाठी स्वयंसेवक मदत करत आहे. आपली सेवा आपल्या दारी या सेवेबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून रविंद्र राजदेव यांनी हा उपक्रम चालू केल्याबद्दल कौतुक केले आणि आभार मानले.

यावेळी म्हसोबा झाप चे सरपंच प्रकाशशेठ गाजरे, बाबाजी दरेकर, नांदूर पठार चे माजी सरपंच भानुदास आग्रे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद आग्रे, बाबाजीशेठ आरोटे, झांबर दरेकर, मंजाभाऊ घाडगे, आशाबाई दरेकर, पांडुरंग आहेर, विठ्ठल दरेकर, रामदास साळवे, रवींद्र घोलप, भाऊसाहेब चौधरी, विष्णू गाढवे, मारुती आग्रे, जनार्दन चौधरी, कैलास राजदेव, संदेश आग्रे, अमोल गाडगे तसेच ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Comment