राज्यातील “या” जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील २४ तासात…..

राज्यातील घाटमाथ्यावर पुढील २४ तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) आज उत्तरी सीमा कायम आहे. तर सौराष्ट्र व कच भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडेल.

राज्यातील घाटमाथ्यावर मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, गेल्या २४ तासांत घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असून, ताम्हिणी, शिरगाव, अंबवणे, दावडी, कोयना, डुंगरवाडी आणि लोणावळा घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला.

Leave a Comment