आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक सुयश लाभेल.

 

वृषभ : एखादी चिंता लागून राहील. प्रियजनांसाठी खर्च कराल.

 

मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. उत्साह व उमेद वाढेल.

 

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

तुळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

कुंभ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. गुरूकृपा लाभेल.

 

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

Leave a Comment