पारनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या पंधरा दिवसांपासून शेतीपंप व घरगुती वीजपुरवठा सुरळीत चालत नसल्याने खडकवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. वीजपुरवठा सुरळीत का चालत म्हणून राजू रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी ६.३० वाजता खडकवाडी सबस्टेशन गाठत ठिय्या मांडला. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली होती.
याबाबतची माहिती मिळताच महावितरणचे शरद गहांडुळे व अजय बासनीवाल यांनी खडकवाडी येथे तातडीने धाव घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. वीजपुरवठा वारंवार का खंडीत होतो? सुरळीत का चालत नाही? या प्रश्नांची सरबत्ती यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर केली. यावेळी लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या मागे घेतला.
यावेळी राजू रोकडे, सुभाष ढोकळे, विष्णुशेठ शिंदे, कैलास आग्रे, शिवाजी शिंगोटे, बाबासाहेब गागरे, धनंजय चौधरी, ए आर तात्या शिंदे, बापू वाळुंज, गणेश बिचारे, तुकाराम ढोकळे, महादू ढोकळे, काशिनाथ ढोकळे , गणेश ढोकळे, संकलेश औटि, सतिष ढोकळे, अमोल म्हस्के, विशाल गागरे, संतोष हुलावळे, खंडूनाना ढोकळे, संपत गागरे, काशिनाथ रोहकले, अनिल गागरे आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
