शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीक विमा भरण्यासाठी ‘एवढी’ मुदतवाढ

अहिल्यानगर – सुधारित पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम, 2025 मध्ये बिगर कर्जदार शेतकर्‍यांना 14 ऑगस्ट 2025 पर्यंत व कर्जदार शेतकर्‍यांना 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुधारित पीक विमा योजना, खरीप हंगाम 2025 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांसाठी, राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2025 करिता सहभागाची अंतिम मुदत 31 जुलै 2025 अशी निश्चित करण्यात आलेली होती.

तथापि, शेतकर्‍यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणार्‍या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने, खरीप हंगाम 2025 मध्ये ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास बिगर कर्जदार शेतकर्‍यांना, 14 ऑगस्ट 2025 पर्यंत व कर्जदार शेतकर्‍यांना 30ऑगस्ट 2025 पर्यंत, मुदतवाढ देण्यात आली आहे.

Leave a Comment