अखेर साकूरला ‘ती’ मुक्कामी बस पुन्हा सुरु, रऊफ शेख यांच्या मागणीला मोठं यश

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या अनेक वर्षांपासुन संगमनेर ते शिबलापुर मार्गे साकूर मुक्कामी बस संगमनेर आगाराकडुन अचानक बंद करण्यात आल्याने या भागातील प्रवाशांची गैरसोय होत होती. शिबलापुर, पानोडी, वरवंडी,कौठे मलकापुर, शेळकेवाडी, दरेवाडी या भागातील प्रवाशांना रात्री परतण्यासाठी एसटी बस नसल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याने या सर्व प्रवाशांच्या गैरसोयीची दखल घेत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे याकडे लक्ष वेधत संगमनेर आगाराची ही शिबलापुर मार्गे संगमनेर ते साकूर ही मुक्कामी बस पुर्ववत सुरु करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी या मागणीची दखल घेत थेट संगमनेर आगार व्यवस्थापकांना फोनवर सुचना केल्यानंतर सदर बस लवकरच सुरु करण्यात येईल असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिले होते.

त्यानंतर वार – बुधवार दि.6 ऑगस्टपासुन या मार्गावरील बससेवा पुर्ववत सुरु झाल्याने रऊफ शेख यांच्या मागणीला मोठं यश मिळाले आहे. तसेच गेल्या अनेक वर्षापासून शिबलापुर मार्गे संगमनेर ते साकूर ही मुक्कामी बस पुर्ववत सुरू झाल्याने रऊफ शेख यांच्यासह पठारभागातील प्रवाशांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहे. तसेच ही बस पुर्ववत सुरु रहावी यासाठी या मार्गावरील जास्तीत जास्त प्रवाशांनी या एसटी बस सुविधेचा वापर करावा असे आवाहन रऊफ शेख यांनी केले आहे.

या बसने पुर्वीप्रमाणेच साकूर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लोकल फेरी करावी. साकूर पठारभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या बससेवा सुरु करण्याचा प्रयत्न असुन अहिल्यानगर, पुणे व शिर्डी साठी बससेवा सुरु करण्यासाठी आमदार अमोल खताळ व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या माध्यमातुन पाठपुरावा सुरु आहे

रऊफ शेख – राज्य कार्यकारिणी सदस्य, भाजपा, अल्पसंख्यांक मोर्चा

Leave a Comment