नगर, पुण्यासह “या” जिल्ह्यांवर मोठं संकट 

आज 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार असून राज्यातील रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे.

उर्वरित राज्यात मात्र उन्हाचा कडाका जाणवेल व कमाल तापमानात वाढ होईल अशी देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यासोबतच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड,सिंधुदुर्ग, धुळे, नासिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे.

Leave a Comment