संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. जांबुत बुद्रुक येथील रहिवासी असलेले आण्णासाहेब लक्ष्मण घुले ( वय ४५ ) हे घरात काही न सांगता घर सोडून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत आदिनाथ अण्णासाहेब घुले यांनी वडील घर सोडून गेल्याने घारगाव पोलिस ठाण्यात मिसींग तक्रार दाखल केली आहे. जवळपास पाच ते सहा दिवस उलटून गेले तरी देखील अण्णासाहेब घुले हे अद्यापही घरी न आल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहे.
मात्र अण्णासाहेब नेमकं घर सोडून का गेले? नेमकं कारण काय? हे अद्यापही अस्पष्ट आहे. या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलिस करीत आहेत.
