साकूर पठार भागातील सात गावांत इंद्रजित थोरातांची सांत्वनपर भेट

संगमनेर( DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागातील सात गावांमध्ये दुःखद घटना घडल्या होत्या. त्यामुळे विविध परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्या पार्श्वभूमीवर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी पठार भागाचा दौरा केला.

तसेच मांडवे बुद्रुक येथील कै. नर्मदाबाई काशिनाथ खेमनर, साकूर येथील कै. तन्वी अजित सगळगिळे, कै. मानसी राजेंद्र सगळगिळे, कै. ज्ञानदेव कारभारी खेमनर, कै. रामभाऊ रेवजी कातोरे, जांबुत बुद्रुक येथील कै. अंजनाबाई लहानू शेटे, जांबुत खुर्द येथील कै. निजाम रमजान पठाण, शिंदोडी येथील कै. विठोबा बारकू कुदनर, वरवंडी येथील कै. वेणुबाई रावबा वर्पे, तसेच रणखांब येथील कै. धोंडाबाई रामभाऊ गुळवे व तुकाराम पांडुरंग शेजवळ यांच्या मातोश्री कै. कौसाबाई पांडुरंग शेजवळ यांच निधन झाले. या सर्व कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळला असून या कुटुंबीयांची थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी सांत्वनपर भेट घेतली. तसेच भेट घेत कुटुंबियातील सदस्यांच सांत्वन केले. यावेळी प्रत्येक कुटुंबियांची इंद्रजित थोरात यांनी आपुलकीने विचारपूस करत धीर दिला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, ज्या त्या गावातील कामगार पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment