मेष : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
कर्क : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
कन्या : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृश्चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.
धनु : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
