संगमनेर(DSNews24 ) तालुक्यातील वडगाव लांडगा येथील तुकाराम राधुजी लांडगे यांच्या मालकीच्या आठ गाईंना चाऱ्यातून विषबाधा झाली होती. मात्र वेळीच धांदरफळ येथील पशुवैद्यकीय डॉक्टर व स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांनी त्या गाईंवरती उपचार केले त्यांना ६ गाईंना वाचविण्यात यश आले मात्र मात्र दोन गाई दगावल्या या घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ नीलम खताळ यांनी लांडगे यांच्या घरी जाऊन त्या कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला.
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे तुकाराम राधुजी लांडगे त्यांच्या ८ गाईंना चाऱ्यातून विषबाधा झाली झाली असल्याची माहिती वडगाव लांडगाचे स्थानिक पशुवैद्यकीय डॉ राहुल जाधव यांनी धांदरफळ बु।। येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली घटनेची माहिती मिळताच धांदरफळ बुद्रुक पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ सचिन वर्पे व डॉ राजाराम भांगरे यांनी तुकाराम लांडगे यांच्या घरी जाऊन गाईंची तपासणी केली असता आठ गाईंना चाऱ्यातून विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले.
त्या पशु वैद्यकीय डॉक्टरांनी वेळीच उपचार केला त्यातील ६ गाईना वाचविण्यामध्ये पशु वैद्यकीय डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना यश आले मात्र यातील २ गाई दगावल्या. त्यामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यावेळी सुरेश लांडगे तुषार वाकचौरे श्रीकांत वाकचौरे विक्रम लांडगे नवनाथ लांडगे अरुण लांडगे धनराज मालुंजकर गणेश लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील तुकाराम लांडगे यांच्या मालकीच्या दोन गाई दगावल्या असल्याची माहिती मिळताच आ. अमोल खताळ यांच्या पत्नी सौ नीलम खताळ यांनी तुकाराम लांडगे यांच्या घरी जाऊन भेट देत त्यांचे सांत्वन केले आणि लांडगे या शेतकर्यांनाआर्थिक मदत मिळवून घेण्या साठी त्यांना मदत करावी
नीलम खताळ – सामाजिक कार्यकर्त्या
