मंत्री विखे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस आमच्या मनातले मुख्यमंत्री

अहमदनगर : आताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहे, मात्र आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. शिर्डी मतदारसंघातील राहता इथल्या प्रकट मुलाखतीमध्ये विखे पाटील बोलत होते.

याआधी तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ शिंदेंबाबत विधान केलं होतं. एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं पाटील म्हणाले, त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला

भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे, असं वक्तव्य केलं होतं

Leave a Comment