भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण तसंच भाऊ धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य केलं आहे.
मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मनोमिलनाच्या बातम्या येत आहेत. हे दोघं बहिण भाऊ एकाच व्यासपीठावरही एकत्र दिसले. मनोमिलनाच्या या चर्चांवर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं.
‘ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये मी उभी राहिली आहे. माझ्या समोरचे उभे राहिले आहेत. जे कोणी उभं राहिल, त्यांचा प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. कॉलेच चालवणं सोपं नाही, त्या ठिकाणी मुलं मुली येतात, त्यांचं भविष्य आणि सुरक्षितता महत्त्वाची असते,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
महाराष्ट्रात एवढे भूकंप झाले तर महाराष्ट्रचं काय होईल, याची मला चिंता आहे. महाराष्ट्रचं राजकारण कसं राहील, याची मला चिंता वाटते. भूकंपाचे कोणतेही संकेत मला असण्याचं कारण नाही, कारण मी या प्रक्रियेचा कुठलाही भाग नाही, त्यामुळे मी यावर भाष्य करू शकणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या
