पारनेर(DSNews24 ) तालुक्यातील खडकवाडी येथील तसेच भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका प्रवक्ता आणि लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य राजेंद्र मधुकर रोकडे यांच्या मातोश्री गं. भा. केसरबाई मधुकर रोकडे यांचे अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते.
स्व. केसरबाई या अतिशय कष्टाळू व मायाळू होत्या. गावातील सण, समारंभ, धार्मिक उत्सव यामध्ये त्या हिरीरीने सहभागी होत असत. अतिशय सामान्य परिस्थितीतून कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या परिवाराला समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची ३ मुले, सुना, मुलगी, दीर, पुतणे असा मोठा परिवार असून या परिवाराने आजारपणात या मातेची उत्तम सेवा केली.
सोमवारी सकाळी ११ वाजता हजारोंच्या समुदायाने स्व.केसरबाई रोकडे यांना अखेरचा भावपूर्ण निरोप दिला. अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार लोकनेते निलेश लंके यांनी या परिवाराचे सांत्वन केले असून राजेंद्र रोकडे यांना सामाजिक कार्यात प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या या मातेचा सार्थ अभिमान वाटतो या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
