मोठी बातमी! महाराष्ट्रातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रातील गृह विभागामध्ये सोमवारी काही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यांतर्गत आयपीएस(IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) जबाबदारी सदानंद आते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

गृहविभागातील फेरबदलांनुसार संजय दराडे यांच्याकडे पुण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे (क्राईम-ब्रांच) विशेष महानिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आलीय. तर अनिल कुंभारेंना एटीएसचे विशेष पोलिस महानिरीक्षक बनवण्यात आले आहे.

आयपीएस नियुक्ती

संजय दराडे – विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

अनिल कुंभारे – विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक

दिलीप सावंत – विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा

 

डॉ.पंजाबराव उगले – अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे विभाग

डॉ.अभिनव देशमुख – दक्षिण मुंबई अप्पर पोलीस आयुक्त

अनिल पारस्कर – अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग

 

एम रामकुमार – अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक विभाग

शशी कुमार मीना – अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मुंबई

ज्ञानेश्वर चव्हाण – विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिषद

 

एस एन पुरे – विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्ह्यांविषयी विभाग पुणे

डॉ. मनोज लोहिया – छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्त

प्रवीण पाटील – अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे

Leave a Comment