मुंबई – राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. पुढील काही दिवस पावसासाठी पोषण वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस अत्यंत महत्वाचे असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज हवामान विभागाने महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर , ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
